?
Ask Question

तत्वनिष्ठ स्पाईन सर्जन


17 Jan 2018
आजोबा स्वातंत्र्यसैनिक, समाजसे्क निष्कलंक राजकारणीही.बालरोगतज्ज्ञ असलेले वडील तत्वनिष्ठ वैद्यकीय व्यायवसायिक. या दोघांचीही तत्वनिष्ठ त्याच्या अंगात भिनलेली. वकील व्हायचे आणि आजोबांप्रमाणे सामाजिक सेवाही करायची असा त्याचे निश्चय होता; परंतु तो झाला डॉक्टर. देशात व परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन 'specialization' केले. अवघ्या पस्तिशीतच तो जागतिक दर्जाचा स्पाईन सर्जन बनला. असा हा पस्तिशीतला उमदा तरुण म्हणजे नगरचे भूषण असलेला पुण्यातील प्रसिद्द स्पाईन सर्जन डॉ अजय कोठारी .
डॉ अजय यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण नगरलाच झाले. बारावीच्या निकालानंतर त्यांनी नगरच्या विधी महाविद्यालयात प्रवेशही घेऊन ठेवला होता. परंतू सहज पणे MBBS ला भारती विद्यापीठात प्रवेश मिळाल्याने त्यांनी तेथे प्रवेश घेतला. MBBS नंतर अस्थिरोग तज्ज्ञ होण्यासाठी DNB ला प्रवेश घेतला. त्यात ते भारतात प्रथम येऊन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. केंद्रीय आरोग्य मंत्री अंबुमणी रामदास व दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शिळा दीक्षित यांच्या हस्ते त्यांचा २००८ मध्ये दिल्लीत गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सचिब व नगर जिल्यातील ज्येष्ठ नेते असलेले दिवंगत आजोबा बन्सीलाल कोठारी, बालरोग तज्ज्ञ असलेले वडील रमेश कोठारी, ज्येष्ठ वकील व सहकारातील नेते असलेले चुलते अशोक कोठारी व बांधकाम व्यवसाईक असलेले दुसरे चुलते सुमतीलाल कोठारी ,असा डॉ. कोठारी यांचा मोठा परिवार. आई चंद्रकला यांचे प्रोत्साहन. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ अजय कोठारी यांना वकील व्हायचे होते परंतू बारावीला चांगले गुण मिळाल्याने कोठारी परिवाराचे स्नेही असलेले पुण्यातील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ . के . एच . संचेती यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डॉ. अजय अस्थिरोग तज्ज्ञ झाले. पुढे त्यांनी DNB च्या माध्यमातून स्पाईन मध्ये specialization केले.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. अजय यांनी पिंपरी च्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग विभागाचे प्रमुख म्हणून करिअर ला प्रारंभ केला. नगरच्या मंडळींना वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी नगरला मोठे अस्थिरोग रुग्णालय उभारण्याचा त्यांचा विचार होता. डॉ.संचेती पिता -पुत्र तसेच आजोबा व कुटुंबीयांनी , पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करून नगरला सेवा देणे अधिक चांगले होईल, असे सुचविले . त्यामुळे सो.अजय यांनी पुण्यात चे राहणे पसंत केले. दरम्यान च्या काळात २००५ मध्ये Physician असलेल्या डॉ. सिंपल यांच्याशी त्यांचा विवाह ठरला. जगप्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉ. मिहीर बापट यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अजय यांना मुंबईच्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये स्पाईन सर्जरीमध्ये पहिली Fellowship मिळाली. पुढे ते संचेती हॉस्पिटल मध्ये रजिस्टर झाले. नंतर डॉ. अजय याना कोईम्बतूर येथील डॉ. एस. राजशेखरन यांच्या जगप्रसिद्ध असलेल्या गंगा हॉस्पिटल मध्ये डॉ. एमजीआर विद्यापीठाची फेल्लोवशीप मिळाली. हि बाब त्यांच्या साठी भूषणावह होती. तेथे स्पाईन बद्दलचे संशोधन व अनुभव त्यांना मिळाला. डॉ. अजय तेवढ्यावरच थांबले नाही. त्यांना जर्मन, सिंगापूर,अमेरिका अशा विविध देशांमधील नामांकित Fellowship मिळाली. अमेरिका सरकारची मिळालेली Fellowship मनाची मानली जाते . लहान मुलांच्या मणक्याच्या शस्र्रक्रियांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या कॅलिफोर्निया तील रॅडिज चिल्ड्रन हॉस्पिटल व शार्प मेमोरियल हॉस्पिटल मधेही त्यांना मोठं अनुभव मिळाला.
शिक्षण व अनुभवाची समृद्ध शिदोरी घेऊन डॉ. अजय पुन्हा २०१३ मध्ये पुण्याच्या संचेती हॉस्पिटल मध्ये स्पाईन सर्जन म्हणून रुजू झाले. आपल्या जन्मभूमीतील मंडळींना आपल्या शिक्षण व अनुभवाचा फायदा व्हावा, यासाठी डॉ. अजय यांनी सकाळ सोशल फाउंडेशन, आरोग्य आधार या संस्थांबाबत मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून योगदान देण्याचा पायंडा सुरु केला आहे. सामाजिक सेवेचे जाळे अधिक व्यापक करून दर्जेदार आरोग्य सेवा तळागाळातील घटकापर्यंत पोचवण्यासाठी डॉ. अजय यांच्या पुढाकाराने बन्सीलाल कोठारी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आहे. डॉ. अजय यांच्या संपर्कातील ५० जणांनी प्रत्येकी २ लाखांची रक्कम फाऊंडेशन ला देऊ केली आहे. त्यामध्ये अधिक भर घालून हि रक्कम बँकेत ठेवायची व त्या द्वारे गरजूना मोफत आरोग्य सेवा द्यायची, असा डॉ. अजय यांचा मानस आहे. पुढील काळात चॅरिटेबल हॉस्पिटल सुरु करून पुण्या-मुंबईच्या डॉक्टरांची सेवा नगरला उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. अजय प्रयत्नशील आहेत. आपल्या नागरकरांचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आपण नगरच्या मंडळींसाठी हि वैद्यकीय सेवा देत आहोत. असे डॉ. अजय आवर्जून सांगतात. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना मन-सन्मान, गाडी, पेसा, बांगला या बाबी ओघाने येतातच .तथापि, गरजूना वैद्यकीय सेवा देण्याचा आनंद कित्येक कोटींपेक्षा अधिक असल्याचे डॉ. अजय सांगतात. उपचारासाठी कित्येक जण जनावरे, शेती ,घरे विकत असल्याचे पाहून मन सुन्न होते. त्यामुळे स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी हि जगा. गरजू व गरिबांचे दुःख दूर करण्यात जे समाधान आहे ते कशातच नाही असेही ते सांगतात. नव्या पिढीतील वैद्यकीय व्यावसायिकांनी आता या विचाराच्या प्रचार व प्रसारासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत, असे डॉ.अजय याना वाटते .
Gallery
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer