मणक्‍याच्या शस्त्रक्रिया टाळणे शक्‍य

अमेरिकेत आजारावर उपचारापेक्षा आजार होऊच नये, यासाठी प्रयत्न केले जातात. विशेषतः हाडांच्या आजाराबाबत विचार केला, तर व्यायामाचे नवीन प्रकार, जेनेटिक्‍स अभ्यास आदींमुळे अनेक शस्त्रक्रिया टळू शकतात. मणक्‍याच्या अनेक आजारात शस्त्रक्रिया टाळणे शक्‍य आहे. याबाबत मी अमेरिकेत सादर केलेल्या शोधनिबंधाचे जगभरातून आलेल्या हाडांच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून स्वागत झाले.

अमेरिकेतील मिनिया पोओलिस (मिनेसोटा) येथे स्कोलिओसिस रिसर्च सोसायटीच्या (एसआरएस) 50 वी वार्षिक सभा झाली. या सभेला मला निमंत्रण होते. सरकलेल्या मनक्‍यांवर विशेष अभ्यास असणारा "स्पॉन्डिले लिस्थेसिस' या विषयावर मी तेथे शोधनिबंध सादर केला. पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये सेवा करताना तसेच अनेक देशांत दौरे करून मनक्‍यांच्या आजारावरील संशोधन करून सादर केलेल्या या शोधनिबंधाचे कौतुक झाले. एक महिन्याच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान 15 दिवस न्यूयार्क येथील "हॉस्पिटल फॉर स्पेशालाइज्ड सर्जरी' या जगातील एक नंबरच्या स्पाईन सेंटरमध्ये व्हिजिटिंग सर्जन म्हणून रुग्ण तपासण्याची संधी मिळाली. तेथे जगातील सर्वोत्कृष्ठ स्पाईन सर्जन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. फ्रॅंक शुवाब यांच्यासमवेत काम केले. विशेषतः वयोवृद्ध लोकांच्या मनक्‍याच्या समस्या व तेथे शस्त्रक्रियाविना उपचार खुपच प्रभावी वाटले. तेथे शस्त्रक्रिया टाळणे हेच लक्ष्य असते. ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असते, त्यांच्यावर दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया, बिनटाक्‍याच्या शस्त्रक्रिया, इंजेक्‍शन थेअरपीवर विशेष अभ्यास करता आला. अमेरिकेत आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊच नये, यासाठी जनरेटिक अभ्यास होत आहे. बाळ जन्मल्यानंतर त्याचे "स्टेमसेल्स' जपून ठेवून पुढील काळात त्याला आयुष्यभर गरजेनुसार ते वापरता येते. याबाबत पुण्याच्या संचेती हॉस्पिटल व न्युयार्क येथील हॉस्पिटल फॉर स्पेशेलाइज्ड सर्जरी यांच्यात तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनासाठी देवाण-घेवाण करणारा करार होणार आहे. यामुळे तेथील तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन टेली कॉन्फरन्सच्या साह्याने भारतातील रुग्णांना मिळू शकेल. याबाबतची सेवा लवकरच संचेती हॉस्पिटलमध्ये सुरू होईल.
हाडांच्या आजाराबाबत नवीन व्यायाम पद्धती येथे पाहण्यास मिळाली. "टायची' ही पद्धती मणक्‍यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. "पिलाटेज' या पद्धतीत मणक्‍यातील कोअर स्नायू मजबुत करण्यासाठी उपयुक्त आहे. तर "ऍक्वा ऍक्‍सिरसायजेस' (पाण्यात चालणे) ही पद्धती संपूर्ण शरिरातील हाडांवर उपयुक्त आहे. "सिलेक्‍टीव्ह नर्व रुट ब्लॉक' ही पद्धती मणक्‍याच्या आजारांवर विशेषतः सरकलेल्या मणक्‍यांवर विशेष फायद्याची ठरली आहे. "ऍपिड्यूटल इंजेक्‍शन थेअरेपी', "फॅसेट ब्लाक' या पद्धतीही खास उपयुक्त ठरल्या आहेत.
पुढील 15 दिवस लुईविल (केंटकी) येथील "लेदरमन स्पाईन सेंटर'मध्ये रुग्ण पाहता आले. तेथे डॉ. स्टिवन ग्लासमन यांच्या मार्गदर्शनाखाली हाडांमधील अत्यंत अवघड आजारांवरील निदान पाहता आले.
?
Ask Question
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.