हाडांचे आजार रोखण्यासाठी अनुवंशिकतेवर संशोधन

अमेरिकेतील सोशल रिसर्च सोसायटीतर्फे हाडांच्या आजाराच्या संशोधनासाठी जगभरातील तीन डॉक्‍टरांची आंतरराष्ट्रीय फेलोशिपसाठी निवड झाली. तिघांमध्ये नगरचे भूमिपूत्र व पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमधील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अजय कोठारी यांचा सहभाग होता. या संशोधनासंदर्भात त्यांनी दिलेली माहिती त्यांच्याच शद्बांत.

हाडांच्या आजारांवरील उपचाराबाबत गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्या बदलांचे फलित विशेषतः अमेरिकेसारख्या देशांत जास्त प्रभावीपणे मिळाले. भारत व तत्सम देशांत मात्र हे तंत्रज्ञान येण्यास उशिर होत आहे. असे असले, तरी सध्याच्या माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अमेरिकेतील डॉक्‍टरही दूर नाही, असे म्हणावे लागेल. अमेरिकेतील सोशल रिसर्च सोसायटी (एसआरएस) ही जगभरातील हाडांचे तज्ज्ञ सभासद असलेली संस्था आहे. हाडांच्या आजारात अधिक संशोधन व्हावे, यासाठी
जागतिक पातळीवर तीन डॉक्‍टरांची निवड झाली. त्यामध्ये डॉ. मेहबूद बली (टर्की), डॉ. किम (चीन) व माझा सहभाग होता.
हाडांच्या आजारातील जगभरातील दहा महत्त्वाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कॅलिफोर्नियातील रॅडी चिल्ड्रन हॉस्पिटल, शार्प मेमोरियल हॉस्पिटलमध्ये संशोधन करताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर संशोधन करता आले. शस्त्रक्रिया न करता बरेच आजार बरे होतात. त्यासाठी नवीन "स्पायनल इंजेक्‍शन थेरेपी', "ऑर्थोपेडीक जेनेटिक्‍स' व "बिनटाक्‍याची दुर्बिन पद्धती' या तीन पद्धतीत झालेले संशोधन जगभरातील डॉक्‍टरांना फायदेशीर ठरणार आहे. तसेच "न्यूरो मॉनिटेरिंग', "सांधे बदलाची अत्याधुनिक पद्धती', "लहान मुलांचे हाडांचे आजार' या विषयावरही अभ्यास केला. या संशोधनादरम्यान जागतिक किर्तीचे डॉ. भेरुज अकबर अनिया (कॅलिफोर्निया), डॉ. ग्रेगोरी मुंडीस (ऑस्ट्रेलिया), डॉ. पीटर न्यूटन (कॅलिफोर्निया) या तज्ज्ञांचाही सहवास लाभला. मनक्‍याचा तिरकेपणा हे या फेलोशिपचे वैशिष्ट्य होते. मणक्‍यामध्ये व्याधी का होतात, याचे कारण जाणण्यासाठी अनुवंशिक अभ्यास महत्त्वाचा असून, असे आजार टाळता येणे शक्‍य आहे, हे संशोधनातून, निष्कर्षातून दाखवून दिले.दाम्पत्यांच्या काही चाचण्या व त्यांचा अभ्यास करून जन्मणाऱ्या अपत्यास कोणते आजार होऊ शकतात, याबाबत केलेले संशोधन आगामी पिढीतील आजार रोखण्यासाठी विशेष फलदाई ठरेल,'' अशा शब्दांत तेथील डॉक्‍टरांनी केलेला गौरव माझ्या व आपल्या देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
विनाशस्त्रक्रिया किंवा दुर्बिनीद्वारे हाडांचे अनेक अवघड आजार बरे करता येऊ शकतात. ही उपचार पद्धती स्वस्त असल्याने भारतातील अनेक रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकेल. अशा उपचारानंतर रुग्ण एक किंवा दोन दिवसांत घरी जाऊ शकतो, तसेच आठ दिवसांत कामावरही जाऊ शकतो. हाडांचा ठिसुळपणा हे हाडांच्या आजाराचे मुख्य कारण असते. भारतीय महिलांमध्ये हाडांच्या आजाराबाबत जास्त प्रमाणात तक्रारी असतात. नोकरी, घरकामामुळे योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश न मिळणे, मैदानी खेळांचा अभाव, असमतोल आहार, कॅल्शियमचे प्रमाण कमी अशी अनेक कारणे हाडांच्या आजाराबाबत असतात. शहरी व ग्रामीण भागातील कारणे वेगळी असतात. त्यांचे योग्य प्रबोधन होणे गरजेचे आहे. भारतातील अवघड हाडांच्या आजारांवर अमेरिकेतील डॉक्‍टरांचा कॉन्परन्सिंगद्वारे थेट रुग्णांशी संवाद घडवून सल्ला घेऊन मार्गदर्शन घेणे आता शक्‍य आहे. माझी फेलोशिपसाठी निवड म्हणजे आपल्या देशाचा, राज्याचाच नव्हे, तर माझ्या मायभूमीचा, नगरचा गौरव आहे.
?
Ask Question
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.